आयुर्वेद शास्त्राचे मूळ सूत्र आहे “स्वास्थस्य रक्षणम्’! स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि व्याधीग्रस्त व्यक्तीला व्याधीमुक्त करणे. आयुर्वेदामध्ये स्वास्थ्याचे रक्षण करण्यासाठी दिनचर्या, तुचर्या, आहार, विहार यांचे योग्य प्रकारे पालन करण्यास सांगितले गेले आहे. मणक्याचे आजार, सांधेदुखी, गुडघेदुखी यांचे मुख्य कारण म्हणजे सतत एकाच जागी बसून काम करणे, वेडेवाकडे बसणे, वाकून, आखडून बसणे. चौरस आहाराचे सेवन न करता जंकफूड घेणे.
मणक्याचे आजार सांधेदुखी, गुडघेदुखी होऊ नये म्हणून प्रत्येकाने रोज साधारणतः 2 ते 5 कि. मी. चालणे. संथगतीने दररोज 30 ते 35 मि. चालल्याने मोठ्या प्रमाणात शरीरातील चरबी कमी होते. चालण्याचा व्यायाम केल्याने स्टॅमिना वाढतो हाडे बळकट होतात. हृदयविकार, मधुमेह (डायबेटिस) असणाऱ्यांना चालण्याचा व्यायाम उत्तम. प्राणायम, योगासने करणे आवयश्यक आहे तसेच त्रास होतो म्हणून वेगवेगळ्या प्रकारची पेनकिलर गोळ्या घेऊ न आजार वाढवून घेऊ नये. आयुर्वेद शास्त्रानुसार सिद्ध तेलाने मसाज केला व आयुर्वेदिक उपचार केल्यास त्याचा चांगला फायदा दिसून येतो. गुडघ्यामध्ये आवाज येत असेल व सांधे घासत असतील तर सिद्धतेलाने दिवसातून 2 ते 3 वेळा मसाज केला व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदशनाने व्यायाम, आहार, विहार केल्यास रुग्णाला चांगला फायदा झाल्याचे दिसून आले आहे.
पोटाच्या तक्रारींसाठी-प्रत्येकाने वेळच्यावेळी जेवण घेणे आवश्यक आहे. रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी 3 ते 4 तास आधी घेणे आवश्यक आहे. म्हणजे त्याचे योग्य प्रकारे पचन होते. आहारात ताक, दूध, फळे सर्व प्रकारच्या भाज्या घ्याव्यात आयुर्वेद शास्त्रात ताकाला खूप महत्त्व दिले आहे. रोजच्या दुपारच्या जेवणात एक ग्लास ताक आवर्जून घ्यावे. त्यामुळे पचनाच्या तक्रारी, मुळव्याध, गॅसेस, मलावष्टभं, वारंवार शौचास जाण्याच्या तक्रारींमध्ये फायदा दिसून येतो.
ताकात (सुंठ, जिरे, धणे समप्रमाणात पूड) घालून घेणे. ताक नसेल तेव्हा जेवणानंतर एक फुलपात्र पाण्यात घेतले तरी चालेल. अपचन, करपट ढेकरा, गॅसेस, आम्लपित्त, वारंवार पोट दुखणे, भूक न लागणे, पोट साफ न होणे, डोके दुखणे, कावीळ, सिरहॉसिस ऑफ लिव्हर, कॅन्सर ऑफ लिव्हर, हेपीटायटीस बी, हिपॅटोमॅगली (लिव्हरचा आकार वाढणे) या आजारांमध्ये फायदा होतो असे दिसून आले आहे.
स्वादुपिंड ग्रंथीचे कार्यामध्ये दोष उत्पन्न झाल्यामुळे रक्तातील, लघवीतील साखरेचे प्रमाण वाढते. आयुर्वेद शास्त्रानुसार कपालभाती, प्राणायाम, योगासने, कटुतिक्त कषाय रसाची शास्त्रात सांगितलेल्या औषधांचा उपयोग केल्यास खूपच चांगला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर पथ्य पाळणे आवश्यक आहे.
क्षारयुक्त पाणी, आहाराचे अति प्रमाणात सेवन झाल्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी रोज साधारणतः 3 ते 4 लिटर द्रव आहारात पाणी असणे आवश्यकच आहे, हे ध्यानात ठेवावे.
The post आयुर्वेद – स्वास्थस्य रक्षणम्’! appeared first on Dainik Prabhat.