आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी या हिमोग्लोबिन प्रोटीन आणि ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करत असतात. स्टोन थेरपीतील आयर्न आपल्याला उपयोगी पडते. तसेच स्टोन थेरपीमधील स्टोनमधील मॅग्नेशियम शरीरातील रक्त व साखर यांची लेव्हल याचसोबत आपले स्नायू आणि मेंदूला जाणाऱ्या रक्त प्रवाहाच्या नसा यावर उत्तम पद्धतीने काम करते. तसेच सिलिका आपल्या शरीरामध्ये कोलॅजिन निर्माण करून मसलमधील लिगामेंटना ताकद देण्याचे काम करते. स्टोन मसाज थेरपीमध्ये स्टोन उष्ण व थंड करण्यासाठी ठराविक तापमान वापरले जाते. त्यासाठी त्याचे ठराविक असे उष्ण व शीत तापमानाचे स्टीमर उपलब्ध असतात.
स्टोन मसाज थेरपीमध्ये ग्रेपसीड, ऑलिव्ह ऑइल, रोजकेड ऑइल, लावेन्डर ऑइल ही ऑइल प्रामुख्याने वापरली जातात. स्टोन मसाज थेरपीमध्ये प्रथमतः शरीरातील व्याधी विचारून त्यानुसार शरीरातील काही भागांवर हे स्टोन थेरपीचे दगड गरम करून ठेवण्यात येतात. त्यांचा ठराविक असा कालावधी असतो. त्यानंतर काही शीत दगडसुद्धा काही शारीरिक भागांवर ठेवण्यात येतात. हे स्टोन थेरपीचे दगड विशिष्ट पद्धतीने उष्ण आणि शीत केले जातात. त्यानुसारच ते शरीरावर वापरले जातात. याचसोबत स्वीडिश मसाज थेरपीचे काही स्ट्रोक या दगडांच्या सहाय्याने शरीराच्या काही भागांवर विशिष्ट प्रभावाने केले जातात. यामुळे शरीराच्या ज्या भागावर हे स्टोन वापरलेले असतात, तेथे दगडांच्या उष्णतेने स्नायूंना सैलपणा मिळतो.
तसेच आयर्न, मॅग्नेशियम आणि सिलिका त्यांचे काम या दगडांच्या माध्यमातून शरीरामध्ये करतात. त्यामुळे शरीरामध्ये स्नायूंना आरामदायीपणा मिळतो, आखडलेले सांधे अथवा हाडे यांनाही आराम मिळतो. स्टोन थेरपीमध्ये प्रामुख्याने संधिवात असलेल्या लोकांना खूपच आरामदायी उपचार मिळू शकतो. स्टोन थेरपी शरीरातील आयर्न, मॅग्नेशियम तसेच कोलॅजिन तसेच लाल रक्तपेशी सुधारण्याचं काम करतो. काही लोकांना दबावाने मसाज घेतल्यानंतर अंगाला सूज येणे, खाज सुटणे अथवा जडत्व येणे अशा गोष्टी होत असतात. त्यांना स्टोन थेरपी मसाज हा उत्तम पर्याय आहे. स्टोन थेरपी मसाज हा एक वेगळाच अनुभव आहे. हा मसाज कोणीही करून घेऊ शकतो. स्टोन थेरपी मसाज अतिशय आल्हाददायी आणि वॉर्मिंग इफेक्ट देणारा असतो. सांधेदुखी असणाऱ्या लोकांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने हा मसाज नक्की करावा. साधारणतः शरीरावरती पाठीचा मणका, पिंढरी, पोट, चेस्ट, हात, तळहात अशा ठिकाणी हे स्टोन थेरपीचे दगड ठेवण्यात येतात.
मसाज सुरू करताना मसाज बेडवर साधारणतः 8 चपटे स्टोन ठराविक अंतरावर बेडच्या मध्यभागी ठेवण्यात आलेले असतात. त्यावर एक पातळ कापड घालून ग्राहकास झोपण्यास सांगतात, हे ठेवलेले चपटे दगड एका सरळ रेषेत पाठीच्या मणक्यावर काम करतात, हे आठ दगड मणक्याच्या दोन्ही बाजूला चार- चार असे ठेवण्यात येतात. ग्राहक झोपतो तेव्हा मणक्याच्या दोन्ही बाजूस एका समान रेषेत हे उष्ण दगड शरीरावर काम करतात, या मसाजमध्ये वापरले जाणारे ऑइल घेऊन हाताच्या साह्याने हलकासा मसाज चेहऱ्याला देण्यात येतो व हनुवटीवर, गालावर, तसेच कपाळावर छोट्या चपट्या आकाराचे स्टोन ठेवण्यात येतात.
सोबतच डोळ्यांवर काकडी अथवा गुलाब जल यांच्यासोबत कापूस ठेवण्यात येतो. दोन चपटे उभ्या आकाराचे स्टोन थेरपीचे दगड घेऊन तळपायापासून मांडीपर्यंत मसाजचे काही स्ट्रोक करण्यात येतात. त्याचसोबत पोटावर हाताच्या सहाय्याने तेल लावून नाभीच्या आजूबाजूला असे काही मसाज स्ट्रोक करण्यात येतात. त्यानंतर थेरपीस्ट चपटे छोट्या आकाराचे स्टोन घेऊन दोन्ही हातांना मसाज करतात व दोन्ही हातांमध्ये काही वेळासाठी स्टोन पकडून ठेवण्यास सांगतात. त्यानंतर पाठीचा मसाज केला जातो. ग्राहकास पोटावर झोपावण्यास सांगून, पाठीवर ठराविक स्टोनच्या साह्याने विशिष्ट पद्धतीचे स्ट्रोक करण्यात येतात. या सर्व मसाज पद्धतीमध्ये ग्राहकाची योग्य त्या पद्धतीने काळजी घेऊन दुखणाऱ्या भागांवरती लक्ष केंद्रित केले जाते. त्यानुसार हॉट स्टोन थेरपीचे दगड वापरून योग्य त्या तेलाच्या सहाय्याने स्वीडिश मसाज केला जातो. स्टोन थेरपी मूळतः शरीरातल्या सात चक्रांवर प्रभाव करते. त्यामुळे हा मसाज सांधेदुखी असणाऱ्या अथवा हाडांची दुखणे असणाऱ्या लोकांना उपायकारी ठरतो. स्टोन मसाज थेरपी घेत असताना योग्य त्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. हॉट स्टोन थेरपी अथवा कूल स्टोन थेरपी करणारे थेरपीस यामधील जाणकार असले पाहिजेत.
गर्भवती महिला, हाय ब्लड प्रेशर, हाय साईड डायबेटीस, इपिलीप्सी, कॅन्सर अथवा व्हेरिकोज व्हेन्स असणाऱ्या लोकांनी स्टोन थेरपी घेऊ नये. काही महिला अथवा पुरुष काही डर्म्टाइटिस ट्रीटमेंट करत असतात. अशातच फिरायला म्हणून बाहेर गेल्यानंतर स्पा मध्ये, एक लक्झरी म्हणून कधी कधी हॉटस्टोन थेरपी करून घेतात, अशा वेळेस आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. आपण अजाणतेपणे आपल्या शरीरामध्ये काही आजार बोलावत असतो म्हणून कोणत्याही स्पा थेरपी करत असताना कायम तज्ज्ञांच्या सल्ल्याने अथवा त्याबद्दल व्यवस्थित माहिती घेऊन करावे.
स्टोन थेरपीही डोकेदुखी, अंगदुखी, मायग्रेन, स्नायूंचं जखडणे, सांधेदुखी, तसेच ज्यांना झोपेचा त्रास आहे त्यांच्यासाठी उत्तम थेरपी आहे. हॉट स्टोन थेरपी मसाज हा आयुर्वेदिक सेंटर, नॅचरोपॅथी सेंटर, अथवा स्पा सेंटर येथे योग्य तज्ञांच्या सल्ल्यानेच करून घ्यावी. थेरपी करत असताना वापरल्या जाणाऱ्या स्टोनबद्दल, तसेच मसाजबद्दल अरोमा ऑइलबद्दल जाणून घेणे हे एक ग्राहक म्हणून आपले कर्तव्य असते. या सगळ्या सेंटरमध्ये आपण जेव्हा जात असतो तेव्हा आपण आपल्या शरीरावर आपल्या पैशाने आपला वेळ खर्ची घालून सेवा करून घेणार असतो. तेव्हा एक ग्राहक म्हणून आपण थोडे जागरूक असले पाहिजे. अनेकदा असे पाहण्यात आले आहे की कमी पैशात मिळते म्हणून कुठेही कशीही स्टोन थेरपी करून घेतली जाते आणि नंतर काही विपरीत अंतर्गत परिणाम हे शरीरात दिसून येतात. स्पा थेरपीमधील मसाज बाह्य शरीरावर होत असतील तरी त्याचे परिणाम अंतर्गत शरीर व्यवस्थेवर काम करतात.
स्पा थेरपीतील फेशियल आणि बॉडी थेरपीचाच एक प्रकार. काय आहे हे स्टोन मसाज थेरपी? स्टोन थेरपी मसाज ही पाच हजार वर्षांपूर्वीपासूनची पारंपरिक भारतीय मसाज पद्धती आहे. ती आजही आयुर्वेदात वापरली जाते. त्याचसोबत स्पा थेरपीमध्येही अरोमा ऑइलच्या साह्याने करण्यात येते. स्टोन मसाज थेरपीमध्ये शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी साधारणता 36 ते 52 प्रकारच्या दगडांनी उष्ण प्रवाह अथवा शीत प्रवाह स्नायूंवर देण्यात येतो. या स्टोन थेरपीचे जे दगड आहेत हे बेसाल्टचे. ज्वालामुखीच्या खडकापासून बनलेले असतात. जे स्टोन थेरपीमध्ये वापरत असून हे स्टोन साधारणतः 45 ते 53 टक्के आयर्न आणि मॅग्नेशियमनी भरपूर असतात. त्याचसोबत त्याच्यामध्ये सिलिकाही असते.
The post आयुर्वेद : स्टोन थेरपी appeared first on Dainik Prabhat.