Saturday, October 17, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आयडीएसचा निष्कर्ष : मधुमेहींना हृदयविकार, रक्तवाहिन्यांच्या आजाराचा धोका

by प्रभात वृत्तसेवा
April 12, 2022
in आरोग्य वार्ता
A A
आयडीएसचा निष्कर्ष : मधुमेहींना हृदयविकार, रक्तवाहिन्यांच्या आजाराचा धोका
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आयडीएसचा निष्कर्ष : मधुमेहींना हृदयविकार, रक्तवाहिन्यांच्या आजाराचा धोका

April 12th, 9:07amApril 12th, 9:07am

प्रभात वृत्तसेवा

आरोग्य जागर

पुणे- नव्याने निदान झालेल्या मधुमेही रुग्णांपैकी 55 टक्‍क्‍यांहून अधिक रुग्णांमध्ये कोलेस्ट्रॉल (एचडीएल) कमी आहे. यामुळे बहुतेक रुग्णांना येत्या काळात हृदय आणि रक्‍तवाहिन्यांचे आजार, उच्चरक्‍तदाब (हायपरटेन्शन) धोका जास्त वाढला आहे. “इंडिया डायबेटीज स्टडीज’च्या (आयडीएस) एका अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

“आयडीएस’च्या निष्कर्षांनुसार अशाप्रकारच्या रुग्णांची संख्या देशामध्ये वाढली आहे. “पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स (पीएलओएस) जर्नल’मध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. मधुमेहांच्या रुग्णांमध्ये हृदय आणि रक्‍तवाहिन्यांचे आजार होण्याच्या धोक्‍याचे प्रमाण शोधून काढणे हा अभ्यासामागचा मुख्य हेतू होता. हा अभ्यास 2020-2021 या कालावधीत करण्यात आला. यामध्ये देशातील 27 राज्यांमधील सरासरी 48 वर्षे वयाचे 5 हजार रुग्ण सहभागी झाले होते. अशाप्रकारचे हे पहिले सर्वेक्षण असून, त्यामधून हाती आलेले निष्कर्ष हे संपूर्ण हृदय आणि रक्‍तवाहिन्यांच्या आजाराचा धोका ओळखण्यासाठी करण्यासाठी केलेली ही अभ्यासाची सुरूवात आहे. रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे, कोलेस्ट्रॉल व्यवस्थापन करणे या उपायांनी या समस्येचे निवारण होऊ शकते.

संशोधनातील निष्कर्ष
*मधुमेहाच्या 55 टक्‍के रुग्णांमध्ये “एचडीएल कोलेस्ट्रॉल’ (गुड कोलेस्ट्रॉल) कमी आढळून आले.
*एकूण रुग्णांपैकी 92 टक्‍के रुग्ण शरीराला घातक कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे आणि 83 टक्‍के रुग्ण उच्च रक्‍तदाबाचे कोणतेही उपचार घेत नाहीत.
*82 टक्‍के रुग्णांना कोलेस्ट्रॉलशी संबंधित किमान एक आजार आहे. तर 37 टक्‍के रुग्णांना उच्चरक्‍तदाब असून, त्यांचे वय 65 वर्षांपेक्षा कमी आहे.
*यापैकी 11 टक्‍के रुग्णांमध्ये अवयवांचे नुकसान होणे किंवा गंभीर किडनी आजार आढळून आला आहे.

नव्याने निदान करण्यात आलेल्या मधुमेही रुग्णांमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांच्या धोक्‍याचे प्रमाण ओळखून त्यावर प्रकाश टाकण्यावर “इंडिया डायबिटीस स्टडी’ने लक्ष केंद्रीत केले आहे. उपचारांचा मुख्य भर आहारातील बदल, शारीरिक हालचाली आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यावर असायला हवा.
– डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन, चेलाराम डायबिटीस इन्स्टिट्यूटचे एंडोक्रिनॉलॉजीचे प्रमुख, सीईओ आणि आयडीएसचे प्रमुख संशोधक

Digital Prabhat
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar