error: Content is protected !!
पुणे – व्हॉट्सऍप हे जगातील सर्वात मोठे मल्टीमीडिया मेसेजिंग ऍप आहे. एकट्या भारतात व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांची संख्या ५५ कोटींहून अधिक आहे. गेल्या काही महिन्यांत, व्हॉट्सऍपने मल्टी-डिव्हाइस सपोर्टसह अनेक मोठी वैशिष्ट्ये सादर केली आहेत. आता बातमी अशी आहे की कंपनी मल्टी-डिव्हाइस फीचर सेवा देणार आहे, म्हणजेच यासाठी ग्राहकांना पैसे भरून सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. तर टेलीग्राममध्ये मल्टी डिव्हाइस सपोर्टची सुविधा मोफत आहे.
मल्टी डिव्हाईससाठी कोणाला किती पैसे द्यावे लागतील?
व्हॉट्सऍप बिझनेससाठी मल्टी डिव्हाइसची सशुल्क सेवा सुरू होणार आहे. WaBetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सऍप आपल्या बिझनेस ऍपसाठी पेड सबस्क्रिप्शन सेवा सुरू करणार आहे. सशुल्क सेवा झाल्यानंतर, व्हॉट्सऍप बिझनेस ऍपचे वापरकर्ते एकाच वेळी 10 डिव्हाइसेसमध्ये समान व्हॉट्सऍप खाते वापरू शकतील. अशा परिस्थितीत, लहान व्यवसायांना एकाच व्हॉट्सऍप नंबरवरून अनेक ग्राहकांशी एकाच वेळी कनेक्ट होण्याचा पर्याय मिळेल, मात्र अद्याप या सदस्यत्वाच्या किंमतीबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही.
व्हॉट्सऍपचे मल्टी डिव्हाइस फिचर काय आहे?
मल्टी डिव्हाइस सपोर्ट म्हणजे एकापेक्षा अधिक डिव्हाइसला सपोर्ट करणे. मल्टी डिव्हाईस सपोर्ट फक्त डेस्कटॉपसाठी आहे, ज्याचे अपडेट काही दिवसांपूर्वी रिलीज झाले आहे. मल्टी डिव्हाईस फीचर अंतर्गत यूजर्स चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर एकच व्हॉट्सऍप अकाउंट वापरू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोनमध्ये इंटरनेट नसले तरी तुम्ही लॅपटॉपवर व्हॉट्सऍप वापरू शकता म्हणजेच व्हॉट्सऍप तुमच्या लॅपटॉपचे इंटरनेट वापरेल.
error: Content is protected !!
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar