Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आता व्हॉट्सअ‍ॅपवर स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत,जाणून घ्या…. कारण

by प्रभात वृत्तसेवा
October 6, 2022
in लाईफस्टाईल
A A
आता व्हॉट्सअ‍ॅपवर स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत,जाणून घ्या…. कारण
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सऍपने यूजर्सच्या सुरक्षेचा विचार करून आणखी एक नवीन फीचर जारी केले आहे. व्ह्यू वन्स मेसेजेसमधून बनवलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट्स आता व्हॉट्सअ‍ॅपवर घेता येणार नाहीत.

या फीचर्सनंतर आता यूजर्सचे चॅट अधिक सुरक्षित होणार आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये व्हॉट्सऍपने यूजर्सची सुरक्षा वाढवण्यासाठी व्ह्यू वन्स मेसेज फीचर जारी केले होते. एक वर्षानंतर, म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्ह्यू वन्स मेसेजमध्ये स्क्रीनशॉट घेण्याचे फिचर बंद करण्याची घोषणा केली.

मार्क झुकेरबर्गने सुरक्षा फीचर्स जारी करताना सांगितले की, ते आता व्हॉट्सअ‍ॅपची सुरक्षा मजबूत करणार आहेत. यासाठी, आम्ही व्ह्यू वन्स मेसेजेस फीचरमध्ये आणखी एक नवीन फीचर समाविष्ट करत आहोत, जे व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांच्या चॅट अधिक सुरक्षित ठेवू शकतात. या फीचरमध्ये व्ह्यू वन्स मेसेजमधून तयार केलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट्स घेता येणार नाहीत.

व्हॉट्सअ‍ॅपचे हे स्क्रीनशॉट ब्लॉकिंग फिचर गुगल पे आणि फोन पेसारखे कार्य करते, जे वापरकर्त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर स्क्रीनशॉट घेण्याची परवानगी देत नाही. त्याचप्रमाणे आता व्हॉट्सऍपवरही व्ह्यू वन्स मेसेजेसवरून मेसेजचे स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत.

असे कार्य करते

या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे चॅट सुरक्षित ठेवू शकता. याआधी व्ह्यू वन्स मेसेज फीचर देखील यूजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन आणण्यात आले होते, या फीचरच्या मदतीने केलेला मेसेज एकदाच पाहता येत होता. व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरनंतर यूजर्सची प्रायव्हसी अधिक सुरक्षित ठेवता येणार आहे. नवीन फीचरनंतर, व्हॉट्सअ‍ॅपने व्ह्यू वन्स मेसेजेसमधील मेसेजेस स्क्रीनशॉटसाठी ब्लॉक केले, त्यानंतर दुसरा यूजर त्यांना एकदाच पाहू शकतो. दुसरा वापरकर्ता तो संदेश जतन करू शकत नाही किंवा त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. तसेच, वापरकर्त्यांकडून व्ह्यू वन्स मेसेज केलेले मेसेजेस स्क्रीन रेकॉर्डद्वारे रेकॉर्ड करता येणार नाहीत.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar