
आता पुरुषांसाठीही मदतगट : “स्व’पासून समष्टीकडे नेणारे “मैत्र’
July 17th, 9:18amJuly 17th, 9:18am
प्रभात वृत्तसेवाआरोग्य जागर
– मेधा पुरकर
आनंदी जीवन जगणे आणि मित्र-मैत्रिणींमध्ये रमणे हा प्रत्येकाचाच अधिकार आहे, असेच वाटतेय ना तुम्हांला? अहो, जे वाटतंय ना ते योग्यच वाटतयं तुम्हांला. मनुष्यप्राणी हा सामाजिक प्राणी आहे, हेच अंतिम सत्य आहे. मागील दीड वर्षांपासून विविध निर्बंधांमध्ये जगत असल्यामुळे आपण पूर्वीसारखे एकमेकांना भेटू शकलो नाही ना, तेव्हाच अनेकांना ही जाणीव झाली.
आपले कुटुंब जेवढे आपल्यासाठी महत्त्वाचे असते ना, तेवढेच आपले मित्र-मैत्रिणीही आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात. आपल्या आयुष्यात विविध प्रसंगांमध्ये मिळणारी त्यांची साथ खूप महत्त्वाची असते. केवळ सिनेमाला, प्रवासाला जाताना सोबतीला असणारे मित्र-मैत्रिणी एवढ्यापुरताच त्यांचा सहवास आवश्यक नसतो, तर अडअडणीच्या प्रसंगी मदत आणि मुख्य म्हणजे एखाद्या निर्णयासाठी आवश्यक भूमिका घेण्यासाठी नाण्याची दुसरी बाजू दाखविणारे विचार मांडणारे म्हणूनही आपण आपल्या या सखा अथवा सखीकडे पाहू शकतो.
हे सगळे करीत असताना ना ते कधी कोणताही आव आणतात, ना आपल्याकडून कोणती अपेक्षा ठेवतात. खरं तर शाळा, महाविद्यालयातील, नोकरी-व्यवसायातील मित्र-मैत्रीणींची आपल्याकडे खूप मोठी यादीच असते. तरीही खरे मैत्र कुठे लाभत असेल, तर जेथे आपल्याला कोणी समजून घेते, आपल्या कोणत्याही विचारांकडे न्यायाधीशाच्या भूमिकेतून न पाहता, अत्यंत पारदर्शकपणे पाहिले जाते तेथे.
हा आणि असाच पारदर्शकपणा ठेवून केवळ महिलांसाठी पुणे येथे मेधा पुरकर यांनी “मैत्र गट’ सुरू केला. मध्यमवयीन, मध्यमवर्गिय महिलांसाठी मैत्र काम करते. ज्या स्त्रिला स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणण्याची इच्छा आहे, माणूस म्हणून सक्षम होण्याची इच्छा आहे, अशी कोणीही मैत्रमध्ये सामील होऊ शकते, त्याचबरोबर परिस्थितीमुळे थोड्या हताश तर काहीश्या निराश झालेल्या, क्षमता असूनही भावनिक आंदोलनाच्या चक्रात अडकून पडलेल्या महिलांसाठी काही करता यावे, या हेतूनेही मैत्र काम करते. फेब्रुवारी 2016 मध्ये सुरू झालेल्या “मैत्र’ला मागील पाच वर्षांत भरभरून प्रतिसाद मिळाला.
तिशीपासून सत्तरीपर्यंतच्या या सगळ्या सख्या पुण्याच्या विविध भागात महिन्यातून एकदा ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या दिवशी त्या एकमेकांना भेटू लागल्या. या भेटींमधून त्यांना आयुष्य सुंदर करण्यासाठी आणखी काही गोष्टी मिळाल्या आणि त्यांचे जीवन आनंदाने जगण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली. अडीअडचणीच्या वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी लागणाजया त्यांच्या आत्मविश्वासात वृद्धी झाली आणि अधिक निर्णयक्षमतेचेही विकसन झाले.
कुटुंबाच्या जबाबदारीतील एक महत्त्वाचा घटक असणाजया या सगळ्या कुटुंबातील आपल्या जबाबदाजया अधिक सक्षमतेने तर पार पाडू लागल्याच, त्याबरोबरच कुटुंबाला बांधून ठेवण्यासाठी आणि नोकरी अथवा व्यवसायतही “टिम बिल्डींग’ करण्यात त्या अग्रेसर झाल्या. मानसिक भावनांच्या व्यवस्थापनापासून आर्थिक व्यवस्थापनापर्यंत आणि शारिरीक तंदुरूस्तीबरोबरच्या आरोग्य व्यवस्थापनामध्येही त्या अधिक कार्यक्षमतेने कार्य करू लागल्या.
वेळेचे नियोजन करण्यामुळे आपले छंद जोपासत आपल्या आवडीचे कार्य करण्यासाठी त्यांना थोडी उसंत मिळू लागली.
अशा एक ना अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या. मैत्र गटामुळे झालेल्या या सगळ्याचा फायदा आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबातील पुरुषांनाही मिळावा यासाठी पुरुष मैत्र गटाची स्थापना करण्याचा विचार मेधा पूरकर यांनी करावी यासाठी त्यांनी पूरकर यांना तशी गळ घातली. या महिलांच्या मैत्र गटातील अनेक महिलांना त्यांच्या जीवाभावाच्या मैत्रीणी होत्या, तर काहीजणी कमी-अधिक मैत्रीणी असणाजया होत्या. पण या मैत्र गटामुळे त्यांना अधिकच्या मैत्रीणी मिळाल्या. ज्या नेहमीच्या मैत्रिणींपेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि विचार करण्याची दुसरी बाजू दाखवणाऱ्याही होत्या आणि आहेत.
त्यामुळेच आपला नवरा, भाऊ, वडील यांनाही नेहमीच्या पठडीतील मित्रांपैक्षा थोडे वेगळे मित्र मिळावेत या उद्देशाबरोबर आपल्यासारखेच त्यांनीही काही समाजोपयोगी उपक्रमात सहभागी व्हावे हा विचार त्यात त्यांनी केला. त्यांचा हा विचार योग्य वाटल्याने मेधा पुरकर यांनी आता “पुरूष मैत्र’ गटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून दर महिन्याच्या दुसजया शनिवारी संध्याकाळी दीड तास मॉडेल कॉलनी येथे हा गट सुरू होतो आहे.
हा पुरूष मैत्र गट काय असेल? तो कशा प्रकारे कार्य करेल? या मैत्र गटाचा उद्देश आणि उद्दीष्टे काय असतील? या आणि अशा अनेक प्रशद्ब्रांची उत्तरे देणारा पहिल्या माहितीपर बैठकीचे आयोजन शनिवार, दि. 17 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे. या पहिल्या बैठकीत सहभागी होण्यासाठी 302, हरिद्वार अपार्टमेंट, वेताळबाबा चौक, मॉडेल कॉलनी येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.