Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आता घरबसल्या करा आरोग्य तपासणी; डॉक्टरांच्या ऑनलाइन सल्ल्यासाठी ‘हे’ आहेत सर्वोत्कृष्ट अॅप्स !

by
July 4, 2023
in फिटनेस
A A
आता घरबसल्या करा आरोग्य तपासणी; डॉक्टरांच्या ऑनलाइन सल्ल्यासाठी ‘हे’ आहेत सर्वोत्कृष्ट अॅप्स !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई – नुकताच 1 जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. हा दिवस डॉक्टर, त्यांचा व्यवसाय आणि त्यांच्या समर्पणाला समर्पित आहे. गेल्या 10 वर्षात आरोग्य क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. त्यातील एक बदल म्हणजे आता आपण घरातूनच डॉक्टरांशी ऑनलाइन बोलू शकता आणि आपल्या आजाराबद्दल सल्ला घेऊ शकता. या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याला अशा अॅप्सबद्दल सांगू, ज्याच्या मदतीने आपण ऑनलाइन डॉक्टरांचा सल्ला घरबसल्या सहज घेऊ शकता. चला तर, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

1. प्रॅक्टो
टेलिमेडिसिन अ‍ॅपच्या यादीमध्ये प्रॅक्टोचे नाव खूप लोकप्रिय आहे. यात मेडिकल डायरेक्टरी आहे. आपण या अ‍ॅपच्या माध्यमातून डॉक्टरांच्या ऑनलाइन भेटी बुक करू शकता आणि ऑनलाइन सल्लामसलत देखील करू शकता.

2. लिब्रेट
लिब्रेट हे आणखी एक लोकप्रिय अॅप आहे. हे अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीसाठी उपलब्ध आहे. या अ‍ॅपच्या साहाय्याने आपण अपॉईंटमेंट बुक करू शकता आणि लॅब टेस्ट देखील बुक करू शकता. या अ‍ॅपमध्ये प्रश्न-उत्तराचे एक फोरम देखील आहे. या अॅपच्या एका वर्षासाठीची सदस्यता आपण 2,500 रुपयांमध्ये देखील घेऊ शकता.

3. अपोलो 24×7
आपण अपोलो हेल्थकेअरबद्दल ऐकले असेलच. ही आरोग्य सेवा ऑनलाइन सेवा देखील प्रदान करते. अपोलो 24×7 अॅपद्वारे आपण ऑनलाइन 80 तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. या अ‍ॅपद्वारे आपण थेट डॉक्टरांशी देखील बोलू शकता.

सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की एकदा आपण सल्लामसलत केल्यानंतर आपण पुढील सात दिवसांसाठी अपोलो 24×7 अॅपवर डॉक्टरांचा मोफत सल्ला घेऊ शकता.

4. रेडक्लिफ
रेडक्लिफ देखील एक उत्तम अॅप आहे. हे अॅप डॉक्टरांच्या थेट सल्ल्यासाठी नाही, परंतु आपण कोणत्याही प्रकारच्या चाचणीसाठी याद्वारे बुकिंग करू शकता. या अ‍ॅपवर प्रोमो ऑफर बर्‍याचदा चालवल्या जातात.

या व्यतिरिक्त आपण व्हीआयपी सदस्यता एका वर्षासाठी 99 रुपयांना घेऊ शकता, त्यानंतर प्रत्येक बुकिंगवर आपल्याला 10% सूट मिळेल. रेडक्लिफ घरातून सॅम्पल्स गोळा करते. हे इतर लॅबपेक्षा स्वस्त देखील आहे.

The post आता घरबसल्या करा आरोग्य तपासणी; डॉक्टरांच्या ऑनलाइन सल्ल्यासाठी ‘हे’ आहेत सर्वोत्कृष्ट अॅप्स ! appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar