नवीदिल्ली – पैशाची गरज असेल तर आपण आपल्या अकाउंटवरील पैसे काढण्यासाठी नेटबँकिंगचा एटीएमचा वापर करतो. आजच्या जमान्यात प्रत्येकाला एटीएम कसे वापरायचे याबाबत माहिती आहे. पैसे काढता येणाऱ्या एटीएम बाबत सर्वांना माहिती आहे. परंतु आता एटीएममधून सोनं देखील काढता येणार आहे. हो हे खरं आहे,जगातील सोन देणार पहिलं एटीएम भारतात बसवण्यात आलं आहे. या एटीएमध्ये तब्बल ५ किलो इतके सोने कॅपॅसिटी आहे.
गोल्डसिक्का या कंपनीने भारतातील हैद्राबादमध्ये पहिले गोल्ड एटीएम बसवले आहे. ज्यामधून सोन्याची नाणी काढता येणार आहेत. ज्याप्रमाणे पैसे काढतो अगदी त्याप्रमाणे गोल्ड काढण्याची प्रोसेस असणार आहे. त्यामुळे आता तुम्ही आपल्या क्रिडित किंवा डेबिट कार्डच्या मदतीने या एटीएमद्वारे सोने खरेदी करू शकणार आहात.
We proudly announce that we have successfully launched Gold ATM and, through this achievement, we unleash the unstoppable journey to make Bharat Sone ki Chidiya phir se, and contribute to the mission of Bangaru Telangana.https://t.co/a2Q25copfW#goldatm #goldatmindia #goldatmhyd pic.twitter.com/Y4QOpuhoSD
— Goldsikka Limited (@goldsikkaltd) December 5, 2022
गोल्ड एटीएममधून ०.५ ते १०० ग्रॅम पर्यंत सोन्याची नाणी खरेदी करता येणार आहेत. १,२,५,१०,२०,५०,१०० अशा वेगवेगळ्या साईजमध्ये या एटीएममधून सोन्याची नाणी खरेदी करता येणार आहेत. ३ डिसेंबर रोजी गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही सुविधा पहिल्यांदा हैद्राबादमध्ये सुरु केली आहे. ही कंपनी सोन्याचावा व्यवसाय करते.
The post आता एटीएममधून काढता येणार गोल्ड ! देशात पहिल्यांदाच ‘या’ ठिकाणी सुरु झाले GOLD ATM appeared first on Dainik Prabhat.