Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आज हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा; जाणून घ्या विशेष महत्व – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
October 8, 2021
in लाईफस्टाईल
A A
आज हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा; जाणून घ्या विशेष महत्व – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – नवरात्रोत्सवातील नऊ दिवसांचा आज दुसरा दिवस. आजच्या दिवशी हिरव्या रंगाला महत्त्व आहे. त्यामुळे हिरव्या रंगाची साडी, वस्त्र परिधान केले जातात. नवरात्रीचा आजच्या दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करण्यासोबतच इतर हिरव्या रंगाच्या ऍक्‍सेसरीजही सहज वापरता येतात. 

नवविवाहिता, विवाहिता हिरव्या रंगाच्या बांगड्या हिरव्या साडीवर मॅचिंग म्हणून घालू शकता. हिरव्या बांगड्या तसेही भारतीय विवाहितांच्या हातात सौभाग्यालंकार म्हणून असतातच. हिरव्या बांगड्यांना थोडा मॉडर्न लूक देऊन तरुणीही वापरू शकतात.

कानातीलआभूषणेही हिरव्या रंगात सहज उपलब्ध आहेत. नाकात सोन्याची नथ परिधान करताना हिरव्या साडीवर आपोआप मॅच होईल कारण नथीतील खडा शक्‍यतो लाल किंवा हिरव्या रंगाचा असतो.

म्हणून हिरव्या रंगाचा खडा असलेली नथ परिधान करा. केसांना रेबिन लावायची पद्धत सध्या फॅशनमध्ये दिसेनासी झाली असली, तरी हिरव्या ड्रेसवर तरुणी केसांना मॉडर्न पद्धतीने रेबिन बांधू शकतात. तसेही दांडिया खेळताना मोकळ्या केसांची अडचण होतेच. अशावेळी हिरव्या रेबिनने केस बांधून छान केस रचना करू शकता.

हिरव्या रेबिन बाजारात सहज उपलब्ध आहेत. दांडिया खेळताना हिरव्या रंगांच्या टिपऱ्या वापरू शकता. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने सगळीकडे हिरवेगार वातावरण आहे. अशा वेळी हिरवा साज लेवून हिरवळीवर सेल्फी, फोटो काढायचीही हौस तरुणी आणि महिला पूर्ण करू शकता.

हरव्या रंगाचे विशेष महत्व –
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. माता ब्रह्मचारिणीला हिरवा रंग आवडतो. या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करावी. ब्रह्मचारणी या रूपात ती आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात असलेली देवी आहे.

या रूपात दुर्गा किंवा पार्वती देवी तपस्या करण्यासाठी हिरव्याकंच पर्वतावर जाते. याठिकाणीच तिचा भावी पती भगवान शिव आहे. इथे ती भगवान शिव यांच्याबरोबर सर्वसंगत्याग करते. म्हणून इथे हिरवा रंग हा विकास, निसर्ग आणि ऊर्जा यांचे द्योतक आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar