Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आजपासून ५४ औषधांच्या किमतीत घट; सरकारचा मोठा निर्णय

by
June 16, 2024
in आरोग्य वार्ता
A A
आजपासून ५४ औषधांच्या किमतीत घट; सरकारचा मोठा निर्णय
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Medicine Price Reduced| आजपासून ५४ जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाढत्या औषधांच्या खर्चामुळे हैराण झालेल्या सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेक अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा हा निर्णय नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या अर्थात एनपीपीएच्या १२४ व्या बैठकीत घेण्यात आला होता. दरम्यान, एनपीपीए देशात विकल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किमती ठरवते, ज्याचा वापर सामान्य लोक करतात.

५४ औषधांच्या किमतींमध्ये घट

या बैठकीत एनपीपीएने निश्चित केलेल्या ५४ औषधांच्या किमतींमध्ये मधुमेह, हृदय, प्रतिजैविक, व्हिटॅमिन डी, मल्टी व्हिटॅमिन, कानाची औषधे इत्यादींचा समावेश आहे. बैठकीत ५४ औषधं फॉर्म्युलेशन आणि ८ विशेष औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

करोडो लोकांना होऊ शकतो फायदा 

एनपीपीएच्या या निर्णयाचा फायदा करोडो लोकांना होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. सध्या देशात १० कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. हे जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांना नियमित औषधांवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत १० कोटींहून अधिक मधुमेहाच्या रुग्णांना कमी झालेल्या या किमतीचा फायदा होईल. Medicine Price Reduced|

गेल्या महिन्यातही सरकारने अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी केल्या होत्या. त्यावेळी ४१ औषधांच्या आणि ६ विशेष औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. अँटीबायोटिक्स, मल्टी व्हिटॅमिन, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित औषधांच्या किमतीही गेल्या महिन्यात कमी करण्यात आल्या होत्या. याशिवाय यकृताची औषधे, गॅस आणि ॲसिडिटीची औषधे, पेन किलर, ॲलर्जीची औषधेही स्वस्त करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सरकारने मोठा निर्णय घेत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे.

हेही वाचा: 

खासदार होताच वादात युसूफ पठाण वादाच्या भोवऱ्यात अडकले ; काय आहे नेमकं प्रकरण वाचा ?

The post आजपासून ५४ औषधांच्या किमतीत घट; सरकारचा मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar