error: Content is protected !!
आक्रोड हे आपल्याकडील सुका मेव्यामधील एक आहे. खरं तर आक्रोडमध्ये कॅलरीज जास्त असतात असा काहीसा गैरसमज आपल्यातील बहुतेकांमध्ये असलेला पाहायला मिळतो. आवडत असले तरीही कॅलरीज जास्त आहेत या कारणाने आक्रोड न खाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मात्र, आक्रोडमध्ये इतर सुक्या मेव्यातील पदार्थांच्या तुलनेत जवळजवळ 21 टक्के कॅलरीज कमी असतात असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात सिद्ध झाले आहे.
आक्रोडमध्ये कॅलरीज कमी असतात हे सिद्ध झाल्यानंतर आता आक्रोड नियमित खाणे फायदेशीर ठरणारे आहे. कारण आक्रोडमुळे शरीराला होणारे फायदेही बरेच आणि महत्त्वाचे आहेत. अक्रोडमध्ये केवळ 146 कॅलरीज असतात ज्या इतर सुक्या मेव्याच्या तुलनेत कमी आहेत.
त्यामुळे आक्रोडमुळे वजन वाढते हा समजही साफ चुकीचा असल्याचे या संशोधनात म्हटले गेले आहे. उलट आक्रोड खाण्याने शरीराला ऊर्जा मिळते जी शरीरासाठी आवश्यक अशीच आहे. त्यामुळे आक्रोड नियमित खाणे शरीरासाठी फायदेशीर असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
error: Content is protected !!
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar