आई एक अशी व्यक्ती आहे जी निःस्वार्थपणे आपल्या मुलांची काळजी घेते. मात्र तुमची आई व्यस्त वेळापत्रकामुळे स्वतःची काळजी घेत नसेल, तर तिची तब्येत चांगली ठेवण्यासाठी, मदर्स डेच्या दिवशी या फिटनेसशी संबंधित गोष्टी तुम्ही तुमच्या आईला भेट म्हणून द्या.
स्टेपर: तुमच्या आईच्या पायात शक्ती आणण्यासाठी किंवा त्यांना मजबूत करण्यासाठी तुम्ही तिला एक स्टेपर भेट देऊ शकता.
स्मार्ट वॉच : आजच्या काळाला डिजिटल युग असेही म्हणतात. त्यात अनेक स्मार्ट गोष्टी आल्या आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकता. आईला असे स्मार्ट घड्याळ भेट द्या, ज्यामध्ये पावले मोजण्याचे वैशिष्ट्य आहे.
योगा मॅट: जर तुमच्या आईला योगा करायला आवडत असेल, तर मदर्स डेच्या दिवशी तुम्ही तिला योगा मॅट भेट देऊन आनंदी करू शकता. यामुळे पायाला आधार मिळेल आणि पायाला घाम येत नाही.
ऑक्सिमीटर: कोरोनाच्या या वाईट टप्प्यात ऑक्सिमीटरची मागणी खूप वाढली आहे. शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी याचा वापर केला जातो. तुम्ही हे तुमच्या आईला भेट देऊ शकता.