Tripti Dimri – अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर स्टारर ‘अॅनिमल’ (Animal)’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील अनेक हॉट सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आणि रणबीर कपूरचा रोमान्स लोकांना खूप आवडला आहे. या चित्रपटानंतर लोकांना अभिनेत्रीचे वेड लागले आहे. या सगळ्यात तृप्तीने (Tripti Dimri) तिची दिनचर्या (डायट प्लॅन) सांगून करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
चहा पिऊन मेंटेन ठेवली फिगर –
अभिनेत्रीने सांगितलं की ती दिवसातून 5 ते 6 कप चहा पिऊन तिची फिगर राखते. तृप्ती खूपच चहाप्रेमी आहेत. ती रोज 5 ते 6 कप चहा नक्कीच घेते. अभिनेत्रीच्या या खुलाशानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
निरोगी आहाराचे पालन करते –
28 वर्षीय अभिनेत्री खूप हेल्दी डाएट फॉलो करते. अभिनेत्री सकाळी 8 ते 8:30 च्या दरम्यान उठते. त्यानंतर दोन ग्लास गरम पाणी पिते. अभिनेत्रीच्या नाश्त्यामध्ये ओट्स, दूध, मनुका, ड्रायफ्रूट्स आणि फळे असतात.
लंच आणि डिनर खास आहे –
ब्रेकफास्टनंतर एक तास अभिनेत्री वर्कआउट करते. ज्यामध्ये कार्डिओ आहे. वर्कआउट केल्यानंतर ती प्रोटीन शेक आणि फळे खाते. अभिनेत्री रोज योगाही करते. तृप्ती दुपारच्या जेवणात डाळ, भात आणि भाजी घेते, रोट्या (पोळी) खात नाही.
तृप्ती डिमरीचा बॉलिवूड प्रवास –
अभिनेत्री गेल्या 6 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तिने 2017 मध्ये ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. याशिवाय तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तिच्या अभिनय कौशल्याचा प्रसार केला आहे. अभिनेत्रीने नेटफ्लिक्सच्या ‘काला’, ‘बुलबुल’ आणि ‘लैला मजनू’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
The post अॅनिमल गर्ल ‘Tripti Dimri’च्या परफेक्ट फिगरचे रहस्य आलं समोर, असा आहे फिटनेस आणि डाएट प्लॅन… appeared first on Dainik Prabhat.