सतत वाढणारं आणि प्रयत्न करूनही कमी न होणारं वजन, थकवा, कसे गळणे यासारखी लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉक्टर थायरॉईडची टेस्ट करायला सांगतात. थायरॉईडचे प्रमाण कमी असल्यास गोळ्या सुरू करतात. पण हे थायरॉईड म्हणजे नक्की काय असते. थायरॉईचा त्रास असणाऱ्यांनी आहारात कोणते बदल करावे लागतात याची माहिती फारच क्वचित दिसून येते. ( Thyroid and diet )
आपल्या शरीरात गळ्याजवळ थायरॉईड नावाची एक ग्रंथी असते. तिचा आकारा एखाद्या फुलपाखराप्रमाणे असतो. तिच्यातून टी थ्री, टी फोर या नावाची दोन संप्रेरके (हार्मोन्स) शरीरात सोडले जातात. ती आपल्या शरीरातील अनेक क्रियांच्यासाठी आवश्यक असतात. उदा. – शरीरामध्ये कॅलरी (ऊर्जा) जाळण्याचा वेग नियंत्रणात ठेवणे, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, स्नायू, नसांना बळकटी देणे इत्यादी.
या ग्रंथींचे काम जेव्हा कमी पडते (हायपोथायरॉईडिझम) तेव्हा या सर्व क्रियांचा समतोल बिघडतो आणि वरील लक्षणे दिसून येतात.
याउलट काही जणांमध्ये या ग्रंथीचे काम आवश्यकतेपेक्षा जास्त होते. (हायपरथायरॉईडिझम). अशावेळी हृदयाची धडधड वाढणे, हाताला घाम सुटणे, वजन कमी होणे, डोळ्यांचा आकार मोठा दिसणे यासारखी लक्षणे दिसून येतात. सध्या हायपोथायरॉईडिझम या प्रकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषतः स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. बऱ्याचदा गरोदरपणात याची सुरुवात होते.
वरील लक्षणांव्यतिरिक्त अंगावर (जास्त करून हात, पाय आणि चेहऱ्यावर) सूज येणे, सांधेदुखाची त्रास, त्वचा कोरडी पडणे, कोलेस्टोरॉलचे प्रमाण वाढणे, डिप्रेशन येणे यांसारखी लक्षणेदेखील दिसून येतात. हायपोथायरॉइडिझम नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहाराची मदत होते. शिवाय संतुलित आहारामुळे हायपोथॉयराईडिझम ची लक्षणे देखील कमी होतात.यासाठी आहारात काय घ्यावे व काय टाळावे ते आता आपण पाहूयात. ( Thyroid and diet )
आहारात घ्यावयाचे अन्नघटकट
– तंतूमय पदार्थ ः
हायपोथायरॉईडिझममध्ये वजन जास्त प्रमाणात वाढते. वजन आटोक्यात ठेवण्याकरिता आहारात भरपूर प्रमाणात तंतूमय पदार्थांचा समावेश करावा. त्याकरिता रोज पालेभाज्या, फळभाज्या, कच्चे सॅलड, मोडाची कडधान्ये, फळे हे योग्य प्रमाणात घ्यावेत.
– थोड्या थोड्या अंतराने थोड्या थोड्या प्रमाणात खावे.
– थायरॉईड ग्रंथीचे कार्य योग्य प्रकारे होण्यासाठी आयोडिन या खनिजद्रव्याची गरज असते. त्यामुळे आयोडिनयुक्त मीठाचा वापर करावा.
-या व्यतिरिक्त ब जीवनसत्त्व, लोह, सिलेथियम, टायरोसिन, ओमेगा थ्री फॅटस्, अँटिऑक्सिडंट्स या अन्न घटकांचा देखील रोजच्या आहारात योग्य प्रमाणात समावेश करावा.
त्याकरिता रोजच्या आहारात पालेभाज्या, दही, ताक, दूध, अंडी, चिकन, मासे, खजूर, गूळ, आळीव, नाचणी, सुकामेवा (बदाम, अक्रोड, काळे मनुके) फुटाणे सर्व प्रकारची फळे, भाज्या यांचा योग्य प्रमाणात समावेश करावा.
आहारात टाळावयाचे पदार्थ
-कॅफेन असणारे पदार्थ म्हणजेच कॉफीचे सेवन टाळावे.
– गॉयट्रोजेन घटक असणारे पदार्थ रोजच्या आहारात घेणे टाळावे. हा घटक थॉयरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतो. या ग्रंथीचे कार्य मंदावते. त्याकरिता आहारात हा घटक असणारे अन्नपदार्थ उदा. सोयाबीन व त्याचे पदार्थ, रताळे, कोबी, फ्लॉवर, शेंगदाणे हे पदार्थ कच्चे खाणे टाळावे. कोबी, फ्लॉवर शिजवून खाण्यास हरकत नाही. रताळे हे उकडून प्रमाणात खावे. ( Thyroid and diet )
-अल्कोहोलचे सेवन तंबाखू, गुटखा यांचे सेवन करणे टाळावे. ध्रूमपान करू नये.
– योग्य आहाराबरोबरच नियमित व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. वजन आटोक्यात ठेवण्यासाठी तसेच शरीरातील चयापचय क्रियेचा वेगळ योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
The post असा असावा थायरॉईड रुग्णांसाठी रोजचा आहार अन्यथा होईल पश्चाताप ! appeared first on Dainik Prabhat.