यांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमीच असतं.जेव्हा ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त हिमोग्लोबिन घटल्यास शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होतं. मग उलट्या होणं, त्वचाविकार, उदासीनता यांसारख्या शारीरिक-मानसिक त्रासांना आयतंच आमंत्रण मिळतं. अशा वेळी ब-6 जीवनसत्त्वयुक्त आहाराचा उपयोग होतो. त्याने हिमोग्लोबिनचं प्रमाण सुधारतं.
पॅरिडॉक्सल, पॅरिडोक्स्झामाईन, पॅरिडोक्साईन हे ब-6 या जीवनसत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येक व्यक्तीला साधारण दोन मिलीग्रॅम इतकी ब-6 या जीवनसत्त्वाची गरज असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी घटते. शरीराची वाढ खुंटते. त्वचाविकार यांसारख्या समस्या उद्भवतात. हाता-पायांतील शक्तीही कमी होते. हात-पायही भरपूर दुखतात. यकृतात स्निग्ध पदार्थ जमून त्याचं कार्य मंदावतं. त्यामुळे मेद आणि प्रथिनांचं शोषण नीट होत नाही.
यकृताचं कार्य मंदावल्यामुळे पोट बिघडतं. हिमोसिडरॉसिस नावाचा विकार होतो. या विकारात यकृत आणि पानथरीत (स्प्लीन) लोहाचे क्षार जमू लागून तिथल्या पेशी नष्ट होतात. अस्थिमज्जेस (हाडांमधला मगज, बेर्नमॉरो) इजा होते. प्रतिकारशक्ती घटते. मज्जांसंस्थेच्या कामात अडथळे निर्माण होतात. लहान मुलांमध्ये ब-6 जीवनसत्त्वांचं घटल्यास त्यांना सारख्या फिट्स येतात.
कधी कधी क्षयाच्या रुग्णांनाही या जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा त्रास होतो. क्षयाच्या आजारात ऍलोपॅथीत आयसोनिकोटिनिक ऍसिड हायड्रॉझाईड नावाचं औषध देतात. या औषध उपचारामुळे ब-6 जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते. यीस्ट या पदार्थात ब-6फ हे जीवनसत्त्व भरपूर आढळतं. तसंच विविध प्रकारच्या बिया, अंकुरीत धान्यं आणि हिरव्या भाज्यांतही याचा भरपूर साठा असतो.
ब-6 जीवनसत्त्वं देणारे अन्नपदार्थ
फळं – केळी, संत्री, सफरचंद, स्ट्रॉबेरी, पपनस, बेदाणा, जरदाळू आणि आक्रोड.
रसाहार, पेयं आणि सरबतं – गाजर, कोबी, काकवी, दूध आणि दुधाचे पदार्थ, संत्री, टोमॅटो, पालक आणि शेळीचं दूध.
सूप आणि भाज्या – फुलकोबी, टोमॅटो, कांदा, बीट, कोबी, अळंबी, पालक, लेटयूस, अल्फा अल्फा, मक्याचं दूध.
कोशिंबिरी – फुलकोबी, बीट, कांदा, टोमॅटो.
चटण्या आणि लोणची – यीस्ट, मिरी, गहू बीज तेल, बटाटा, कांदा, टोमॅटो.
तेल – भाततूस तेल, सोयाबीन तेल आणि मक्याचं तेल. (ही तेलं फक्त गाळलेलीच हवीत म्हणजे फिल्टर्ड रिफाईंड, हायड्रोजनेटेड अजिबात नको.)
कच्चे, शिजवून, भाजून आणि उकडून खाण्यायोग्य पदार्थ – फुलकोबी, शेंगदाणे, बटाटे, फरसबीचे दाणे, डाळी, सालपटांसह धान्यं, ओट्स (एकप्रकारचं गव्हासारखं धान्यं), वाटाणा, तांदूळ, गहू, घरगुती चीज, मका.
फळांमध्ये दडलंय ओठांच आरोग्य
हवामानातील बदलाचा परिणाम हा त्वचेवरही होतो. वातावरणातील गारठ्यामुळे ओठांची त्वचा कोरडी पडते. कधी कधी ओठांना भेगा पडून त्यातून रक्त वाहू लागतं. तरुण, मध्यमवयाच्या रुग्णांपेक्षा वृद्धांमध्ये ओठांची त्वचा कोरडी पडून त्यातून रक्त वाहण्याच्या तक्रारी जास्त आढळतात. वाढत्या वयामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होत जातो. पाणी, फळं आणि कोशिंबिरीतून ओठांना जास्तीत जास्त नैसर्गिक पाण्याचा ओलावा मिळतो. त्यासाठी चोवीस तासांत किमान आठ-दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. फळांमध्ये आणि कोशिंबिरींमध्ये पाण्याचा भाग 75 टक्के असतो.
त्यामुळे हे दोन्ही पदार्थ खाणं हे त्वचेबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. ओठांचा मऊपणा टिकवण्यासाठी त्यांना नियमितपणे पेट्रोलियम जेली किंवा ई जीवनसत्त्व असलेल कोल्ड क्रीम लावणं गरजेचं आहे. हल्ली बाजारात निरनिराळे लीप ग्लासेसही उपलब्ध आहेत. मात्र ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लावावेत.
ओठ काळे पडण्यांचं प्रमुख कारण आहे उन्हाळा. ओठांना जास्तीचं ऊनही सहन होत नाही. सतत उन्हात फिरण्याने सूर्य किरणातील अतिनील घटनांमुळे (अल्ट्राव्हायलेट) ओठ काळे पडतात. यासाठी दुपारच्या वेळेत उन्हात जाणं टाळावं. सनस्क्रीनचा वापर करावा. शरीरात जर हिमोग्लोबीन या घटकाची कमतरता निर्माण झाली असेल तरीही ओठ काळसर दिसतात. त्या
साठी सर्व पालेभाज्या, फळं, मोड असलेली कडधान्यं यांचा आहारात समावेश असणं गरजेचं आहे. अनेक वेळा ओठांच्या कडांना चिरा पडतात. त्याचं कारण आहे, बफ जीवनसत्त्व आणि झिंक या खनिजाची कमतरता. त्यासाठी झिंक असलेली मल्टीव्हिटामिनची औषधं घेणं फायद्याचं ठरतं. पौष्टिक आहार, भरपूर पाणी, तसंच फळं आणि कोशिंबिरीतून ओठांना भरपूर ओलावा मिळतो.
– डॉ. क्रांती कदम