अश्वगंधा ही वनस्पतीची एक प्रजाती आहे जी प्रामुख्याने दक्षिण आशियामध्ये वाढते. ही प्रामुख्याने भारत आणि शेजारील देशांमध्ये आयुर्वेदिक औषध म्हणून लोकप्रिय आहे.
अश्वगंधाचे उपयोग
आयुर्वेदिक औषध आणि उपचार पद्धतींचा एक महत्त्वाचा भाग म्हणून वैदिक लेखनात अश्वगंधाचे वर्णन केले गेले आहे. आयुर्वेदिक औषध ही एक समग्र औषधी प्रणाली आहे जी किमान 3,000 वर्षांपासून चालत आली आहे. मानवी मन आणि शरीर यांचा सुंदर मिलाफ आयुर्वेदा मध्ये पाहायला मिळतो. आयुर्वेद शिकवते की निरोगी मन निरोगी शरीर आणि आत्मा बनवते. हे देखील शिकवते की निरोगी शरीरच निरोगी मन आणि पर्यायाने निरोगी आत्मा बनवते. शरीर आणि मन एकत्र बांधलेले असते त्यामुळे एका यंत्रणेला त्रास की त्याचा परिणाम दुसऱ्या यंत्रणेवर होतो.
आयुर्वेदामध्ये चक्र संरेखन, वनौषधी उपचार, आहार प्रतिबंध आणि व्यायाम याद्वारे आध्यात्मिक उपचार केले जातात. आयुर्वेदिक उपचारांमध्ये अश्वगंधा ही एक मुख्य वनौषधी मनाली जाते.
अश्वगंधाचे कोणते फायदे आहेत?
अश्वगंधा ही शक्तिवर्धक औषधी वनस्पतींपैकी एक आहे. अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे. पण तिचे याचे योग्य प्रमाणातच सेवन करणं देखील आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या ओळखीच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अश्वगंधामध्ये अँटी- ऑक्सिडंट, अँटी इंफ्लेमेटरी, अँटी स्ट्रेस, अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. यातील औषधी घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि चांगली झोप मिळण्यास मदत मिळते. शिवाय मेंदूची कार्यप्रणाली देखील सुरळीत सुरू राहते.अश्वगंधाच्या सेवनाने त्वरित रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच आराम आणि चांगली झोप मिळते, आणि मेंदूच्या कार्यप्रणालीला सुरळीतता आणि सुधारणा होते.
अश्वगंधाच्या नियमित सेवनाने पुरुषांचे वंध्यत्व सुधारण्यात खूप फायदा होऊन त्यांचे लैंगिक कार्यसुद्धा पूर्ववत साधारण होण्यास मदत होते. आणि त्यांची सुपीकता पातळी सुद्धा सुधारते. अश्वगंधामुळे पुरुषांची शुक्राणूंची संख्या वाढून त्याची गतिशीलता सुद्धा वाढते हे वैद्यकीय अभ्यासाने आता मान्य केले आहे.
अश्वगंधाचा सेवन पुरुषांच्या बळकटीसाठी मदत करू शकतो. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोनचे स्तर कमी असेल आणि त्यामुळे त्यांना लैंगिक समस्यांच्या समस्या असतील. तर अश्वगंधा पुरुषांच्या टेस्टोस्टेरोनचे स्तर सुधारण्यात मदत करू शकते.पुरुषांमध्ये वयोमानाप्रमाणे टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होत जातो, त्यामुळे शरीरीरक ऊर्जा कमी होऊ शकते. नियमित अश्वगंधा सेवनाने पुरुषांना लैंगिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
अश्वगंधाच्या नियमित सेवनामुळे शारीरिक ऊर्जा वाढते त्यामुळे माणूस अधिक कार्यक्षम होतो. अश्वगंधा सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि निद्रानाशाच्या समस्येपासून मुक्ती मिळते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही औषधी अशक्तपणा दूर करते
अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिटंड आणि अँटिइन्फ्लेमेटरीचे गुण आढळतात. यामुळे हृदयासंबंधित समस्येपासून वाचता येते. अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी अधिक मजबूत होतात आणि कोलेस्ट्रॉलचा खराब स्तर कमी करण्यासाठी याची मदत होते. वर्ल्ड जर्नल ऑफ मेडिकल सायन्सच्या शोधातूनदेखील ही गोष्ट सिद्ध झाली आहे.
थायरॉईडग्रस्त असणाऱ्या रोगींसाठी अश्वगंधा उपयुक्त आहे. नियमित स्वरूपात अश्वगंधा खाल्ल्यास, थायरॉईडच्या त्रासापासून मुक्तता मिळते. तसंच हे घेताना डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या म्हणजे त्याचं किती प्रमाण पोटात जायला हवं ते तुम्ही त्यांना विचारून घ्या अश्वगंधाचे फायदे अनेक आहेत. त्यामुळे जगभरात याचा वापर करण्यात येतो. वैज्ञानिकदेखील अश्वगंधाचे फायदे अधिक स्वरूपात मानतात. यामुळे शारीरिक समस्या, आजार आणि रोगांपासून वाचण्यासाठी याची मदत घेतली जाते.मधुमेह आणि रक्तदाब अशा आजारांवरही अश्वगंधा औषध म्हणून वापरली जाते यावर अजून संशोधन चालू आहे त्यामुळे ही वनस्पती खऱ्या अर्थाने आयुर्वेदिक मानवासाठी वरदान ठरत आहे.
The post अश्वगंधाचे हे फायदे एकदा पाहाच; स्त्री-पुरुषांना अमृतापेक्षा कमी नाही appeared first on Dainik Prabhat.