साहित्य व कृती:
100 ग्राम काजू, 50 ग्राम बदाम, 25 ग्राम मगज बी, 25 ग्राम पिस्ते, 10 gram बडीशेप, 10 ग्राम सुंठ, 10 काळी मिरी, 10 लवंग, सगळे वेगवेगळे 1 तास पाण्यात भिजवून ठेवणे. 400 ग्राम साखरेत भिजण्या पुरते पाणी घालून पाक करून घेणे.
सगळे भिजवलेले पदार्थ मिक्सर मधून पेस्ट करून घेऊन साखरेचे पाकात घालून शिजवून घ्यावे त्या मध्ये वेलची, जायफळ पावडर, केशर, 2 काड्या थंडाई घालणे.
1 भाग थंडाई घेऊन त्यामध्ये 3 भाग थंड दुध घालुन मिक्सर मध्ये फिरवून घेणे. आवडीनुसार व्हॅनिला आईसक्रीम घालणे मस्त रिफ्रेशींग थंडगार थंडाई तयार.
– उषा कर्डिले, ओतूर