Saturday, August 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अशी घ्या, तुमच्या नाजूक व सुंदर डोळ्यांची काळजी

by प्रभात वृत्तसेवा
June 3, 2021
in आरोग्य वार्ता
A A
अशी घ्या, तुमच्या नाजूक व सुंदर डोळ्यांची काळजी
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सहसा “डोळे हे जुल्मी गडे, रोखूनी मज पाहू नका’ अशी गाण्याची एक ओळ प्रसिद्ध आहे. मात्र, हे डोळे आरोग्यदायी आणि सदासतेज ठेवण्यासाठी आपण काहीच प्रयत्न करताना दिसत नाही. येथे डोळ्यांची (Eye care) काळजी घेण्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा जरुर विचार करावा..

निरोगी, स्वच्छ, सतेज डोळे हे त्या व्यक्तीच्या निरोगीपणाचे लक्षण समजले जाते. डोळ्यांची (Eye care) ठेवणच अशी असते की, त्यांचे निसर्गतःच रक्षण होत असते. डोळे खोबणीत अगदी सुरक्षित असतात. भुवया, पापण्या डोळ्यांचे धूळ, कण, उन्हापासून रक्षण करण्यास सज्ज असतात. डोळ्यांचे रोगांपासून, दृष्टिदोषांपासून रक्षण करणे हे मात्र आपल्यालाच करावे लागते. आपल्या डोळ्यांना त्यापासून लांब ठेवणे हे त्याच्या भल्यासाठीच असते. स्वतःच्या डोळ्यांची निगा राखणे हे स्त्रीच्या दृष्टीने जेवढे महत्त्वाचे तेवढेच आपल्या मुलाबाळांच्या डोळ्यांचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

डोळ्यांची निरोगी वाढ व्हावी आणि ते शेवटपर्यंत चांगले, कार्यक्षम राहावेत यासाठी बालपणापासून पोषक आहार मिळणे आवश्‍यक असते. पूरक आणि पोषक आहारच इतर अवयवांप्रमणेच डोळ्यांनाही कार्यक्षम आणि निरोगी राखू शकतो. हा आहार समतोल असावा. डोळ्यांना (Eye care) अ जीवनसत्व आणि प्रोटिन्सची आवश्‍यकता असते. हिरव्या पालेभाज्या विशेषतः पालक, मेथी तसेच चवळी, मूग यांसारखी कडधान्ये, पपई, आंबा यांसारखी फळे यांमध्ये अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. दूध, अंडी, मांस, मासे यांच्या आहारामुळेही अ जीवनसत्व मिळते. आवश्‍यक असलेल्या आहाराच्या अभावामुळे डोळ्यांचा टवटवीतपणा, सतेजपणा कमी होत जातो.

बालपणापासून असा आहार मिळाला नाही तर पुढे डोळ्यांच्या (Eye care) गंभीर तक्रारी सुरू होतात आणि त्यातून अंधत्वही येऊ शकते. निःसत्व आहाराचा परिणाम जन्मभर भोगावा लागतो. गरोदर असलेल्या स्त्रियांमध्ये अंधुक, मंद प्रकाशात कमी दिसण्याचे प्रमाण बरेच असते. याचे कारणही हेच असते. तिच्यासाठी आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाच्या पोषणासाठी तिला जीवनसत्वयुक्त आहाराची जास्त प्रमाणात गरज भासत असते आणि अशा आहाराच्या अभावामुळे तिच्या दृष्टीवर परिणाम होत जातो. अंगावर पाजणा-या मातेच्या बाबतीतही असेच होते. तेव्हा गरोदर असणाऱ्या आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रीला अ जीवनसत्व आणि प्रोटिन्स यांची जास्त प्रमाणात आवश्‍यकता असते, ती तिला मिळाली पाहिजेत.

नाही तर त्याच्या अभावी आई आणि बाळ या दोघांच्याही दृष्टीवर परिणाम होईल. अंगावरच्या दुधासारखे कोणतेही दूध बालकांना पूर्णान्न होऊ शकत नाही. आईचे दूध बालकाची दृष्टी निरोगी बनविते हे प्रत्येक आईने आवर्जून लक्षात ठेवायला हवे. बाळंतपणाच्या पहिल्या दिवशी जे दूध येते ते काहीसे पिवळे आणि चिकट असते. हे दूध अ जीवनसत्वांनी संपन्न असते, नवजात अर्भकाला हे दूध अवश्‍य पाजावे. पहिल्या दिवशीचे दूध बाळाला अपायकारक असते ही समजूत अत्यंत चुकीची आहे.

संसर्गापासून काळजी :

आपल्या देशात डोळे येणे, डोळे चिकटणे यासारखे संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणावर आढळतात. याचे प्रमाण खेड्यात राहणाऱ्या लोकांत आणखीनच जास्त असते. रोगाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या सानिध्यात येणाऱ्या अनेकांना या संसर्गजन्य रोगाच्या जंतूपासून रोग होऊ शकतो. रोग्याने वापरलेले काजळ, सुरमा आणि सुरमा लावायची सळई, टॉवेल इत्यादी वस्तू दुसऱ्या कोणी वापरल्या तरीसुद्धा त्यांना रोग होऊ शकतो. खेड्यातील स्त्रिया आपल्या मुलांचे तोंड, डोळे पुसताना नेहमीच आपल्या पदराचा वापर करतात.

हे चुकीचे आहे. त्यामुळे पदराची घाण, जंतू मुलाच्या डोळ्यांत (Eye care) सहजपणे जातात. या स्त्रियांना नेहमीच धूळ, धूर इत्यादी गोष्टींना तोंड द्यावे लागत असल्याने त्यांचे डोळे निरोगी राहू शकत नाहीत आणि त्रास होत असूनही त्या डोळ्यांकडे दुर्लक्षच करतात, वेळीच उपचार करून घेत नाहीत. त्यामुळे पुढे त्यांच्यात दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो. कधी अंधत्वही येते. केवळ वेळीच उपचार न केल्यामुळे नंतर कायमचे डोळे गमावल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात ती यामुळेच.

यासाठी डोळे जाऊ नयेत म्हणून प्रत्येक स्त्रीने डोळ्याचे आरोग्य सांभाळायला हवे. काही शंका आली तर ताबडतोब सल्ला घेऊन त्यावर उपचार करायला हवेत. आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यांविषयी (Eye care) तिने खबरदारी घ्यायला हवी. मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्याविषयी तिने जागरूकता दाखवायला हवी.

डोळ्यांची प्रसाधने वापरू नका. आपल्या देशातील जवळजवळ प्रत्येक स्त्री डोळ्यामध्ये काजळ अगर सुरमा घालीत असते. डोळ्याचे सौंदर्य खुलावे हा त्यामागचा उद्देश असतो. पण त्याचे परिणाम मात्र काही वर्षांनंतर दिसू लागतात. सुरम्यामध्ये डोळ्याची बुबुळे मोठी करण्याचे गुणधर्म असतात. पण काही काळानंतर ते दृष्टीला पूरक ठरण्याऐवजी मारकच ठरतात. काजळात तर काजळी असते, कण असतात.

त्यामुळे डोळ्यांना इजा होते. काजळ डोळ्यात (Eye care) घालण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे रोग फैलावतो ते वेगळेच. काजळ किंवा सुरमा यांच्यामुळे आपल्या डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नसतो. त्यांच्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य वाढते हीसुद्धा स्त्रियांची भ्रामक कल्पना असते. त्यामुळे काजळ किंवा सुरमा न वापरणे हेच चांगले. काजळ आणि सुरमा वापरण्याने होणारे दूरगामी परिणाम टाळण्यासाठी ते न वापरण्याचा (विशेषतः खेड्यातील स्त्रिया नेहमीच चुलीपुढे बसून काम करीत असल्याने त्यांना धुराचा सतत त्रास होत असतो.) निश्‍चय करणे केव्हाही चांगले.

तुमच्या भुवया नैसर्गिक राहू द्या. सध्या आपल्या उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय स्त्रिया आपल्या भुवया कोरून घेत असतात. भुवया कोरून घेण्यापाठीमागे आपल्या चेह-याचे सौंदर्य वाढावे असा त्यामागचा त्यांचा उद्देश असतो. भुवया आणि पापण्यांना आकार देण्यासाठी त्या ज्या पेन्सिलचा वापर करतात त्या पेन्सिलीतील द्रव्यामुळे त्वचेला बाधा होण्याची दाट शक्‍यता असते. डोळ्याभोवतालची त्वचा ही अत्यंत नाजूक असल्याने अशा सौंदर्यप्रसाधनांचा तिच्यावर गंभीर परिणाम होत असतो. अर्थातच डोळ्यांवरही (Eye care) त्याचा परिणाम होण्यास वेळ लागत नाही. हे टाळण्यासाठी अशा तऱ्हेच्या सौंदर्यप्रसाधनांचा, मोह स्त्रियांनी टाळणे त्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक असते. इतर शारीरिक अवयवांप्रमाणेच डोळे हा आपला महत्वाचा अवयव आहे. तेव्हा डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

– डॉ. शितल जोशी

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar