Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अरे वा भारीच! आता हवेतून चार्ज होणार इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे

by प्रभात वृत्तसेवा
September 7, 2021
in लाईफस्टाईल
A A
अरे वा भारीच! आता हवेतून चार्ज होणार इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

टोकियो – दररोजच्या वापरातील इलेक्‍ट्रोनिक उपकरणांचे चार्जिंग करण्याची कटकट आता कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. हवेत आपोआप ही उपकरणे चार्ज होणार असून जपानी वैज्ञानिकांनी अशा प्रकारची एक वायरलेस चार्जिंग रूम तयार केली आहे. लॅपटॉप किंवा मोबाइल चार्ज करण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्लग किंवा वायरची गरज भासणार नाही.

कोणत्याही विद्युत क्षेत्राच्या अभावी चुंबकीय क्षेत्र तयार करण्याचे हे नवीन तंत्रज्ञान असून त्या तंत्रज्ञानाचा वापर करूनच केवळ हवेतून ही उपकरणे चार्जिंग करणे शक्‍य होणार आहे. या वायरलेस चार्जर रूममध्ये जरी चुंबकीय क्षेत्र असले तर त्या रूममध्ये उपस्थित असलेले माणसे किंवा प्राणी यांना त्याचा कोणताही त्रास होणार नाही असा दावा या वैज्ञानिकांनी केला आहे. जपानमधील टोकियो युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी दहा बाय दहा क्षेत्रफळाची ही चार्जिंग रूम तयार केली आहे.

या रुम मध्ये पन्नास वॅट पर्यंत विद्युत शक्ती उत्पन्न होऊ शकते. या रूममध्ये माणसांना बसवून सर्व प्रयोग करण्यात आल्यानंतर माणसाला त्याचा कोणताही त्रास होत नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. अद्याप हा प्रयोग प्राथमिक पातळीवर असल्याने ही वायरलेस रूम तयार करण्यासाठी किती खर्च येईल हे सांगणे शक्‍य नाही; पण प्रत्यक्ष लोकांपर्यंत हा प्रयोग पोहोचण्यासाठी आणखी बराच कालावधी जाणार आहे.

वायरलेस चार्जिंग रूमच्या प्रत्येक भिंतीला लम्पड कपॅसिटर लावण्यात आले असून त्याच्या माध्यमातून मॅग्नेटिक फिल्ड तयार होते. वायरलेस रूमच्या मधोमध एक खांब उभारण्यात आला असून तो संपूर्ण खोलीमध्ये मॅग्नेटिक लहरींचे योग्य प्रकारे वितरण करण्याचे काम करतो. प्रत्येक इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांमध्ये उपस्थित असलेली कॉईल मॅग्नेटिक फिल्डला आपोआप जोडली जाते आणि उपकरणे चार्ज होतात.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar