Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ! जाणून घ्या लहान वयात हृदयविकाराचा झटका का येतो?

by प्रभात वृत्तसेवा
September 2, 2021
in आरोग्य वार्ता
A A
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ! जाणून घ्या लहान वयात हृदयविकाराचा झटका का येतो?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस सीझन 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थ फक्त 40 वर्षांचा होता. एवढ्या लहान वयात हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू होणे धक्कादायक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनेक मूलभूत आरोग्य समस्यांमुळे, लोक लहान वयातच या प्रकारच्या समस्येला बळी पडतात. सिद्धार्थ शुक्लालाही आधी अशी काही समस्या होती का? सध्या ते स्पष्ट नाही.

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी कॉन्फरन्स 2019 मध्ये सादर केलेल्या एका संशोधनात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या धोक्यावर प्रकाश टाकण्यात आला. या अभ्यासात संशोधकांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षांत हृदयविकाराची दोन टक्के प्रकरणे 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आढळल्याचे दिसून आले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरुषांना वयाच्या 65 नंतर हृदयविकाराचा धोका जास्त असतो, तर महिलांना वयाच्या 72 व्या वर्षानंतर हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यामुळेच कमी वयातील लोकांमध्ये हृदयविकाराचे वाढते प्रमाण हे अत्यंत चिंताजनक आहे.

 तरुण वयात हृदयविकाराचा धोका किती सामान्य आहे?
आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की हृदयविकाराचा झटका किंवा 40 वर्षांखालील इतर हृदयरोगामुळे मृत्यूची प्रकरणे पूर्वी खूप कमी होती. अलिकडच्या वर्षांत त्यात वाढ झाली आहे. सर्वसाधारणपणे, शारीरिक हालचाली जसे की खेळणे किंवा व्यायाम करणे यादरम्यान हृदयविकाराचा धोका संभवू शकतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये हे होण्याची शक्यता जास्त असते. आरोग्य तज्ञांच्या मते, ज्या प्रौढांना आधीच कोरोनरी आर्टरी रोगासारखे आजार आहेत, अशा लोकांनी जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

तरुण वयात हृदयविकाराची कारणे कोणती?
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, जीवनशैलीच्या अनेक वाईट सवयी तुम्हाला लहान वयातच हृदयरोगी बनवू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियाक अरेस्टचा धोका वाढतो. धूम्रपान हा तरुण लोकांमध्ये हृदयरोग आणि हृदयविकाराचा सर्वात मोठा जोखीम घटक आहे. धूम्रपान करणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता इतर लोकांपेक्षा आठ पटीने जास्त असते. या व्यतिरिक्त, तरुणांमधील तणाव आणि नैराश्याची झपाट्याने वाढणारी प्रकरणे देखील यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणून पाहिली जातात. उच्च रक्तदाब, हायपरकोलेस्ट्रोलेमिया आणि लठ्ठपणाची समस्या देखील लहान वयात हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात.

ही चिन्हे ओळखा
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराचा धोका ओळखून हे टाळता येऊ शकते, यासाठी काही लक्षणे दिसल्यास काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हालाही अशी लक्षणे जाणवत असतील तर काळजी घ्या. यासंदर्भात त्वरित हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
– छातीत किंवा हातांमध्ये तीव्र वेदना होणे, जे हळूहळू मान, जबडा किंवा पाठीत पसरते.
– मळमळ, अपचन, छातीत जळजळ होणे
– श्वास घेण्यात अडचण
– थकवा आणि जास्त घाम येणे
– जास्त चक्कर येणे
हृदयविकाराची ही लक्षणे सर्व लोकांमध्ये सारखी नसतात. काही लोकांना छातीत सौम्य वेदना होऊ शकतात तर काहींना तीव्र वेदना होऊ शकतात. काही लोकांना आधीपासून त्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, तुमच्याकडे जितकी जास्त लक्षणे असतील तितकीच तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे.

तरुण वयात हृदयविकाराचा धोका कसा टाळावा?
डॉक्टर म्हणतात, हृदयविकाराच्या धोक्यापासून तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता, तुम्हाला फक्त त्याची लक्षणे आणि संभाव्य घटकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला हृदयरोगाशी संबंधित समस्या असतील किंवा आधी हृदयविकाराचा झटका आला असेल तर डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमितपणे घेत रहा. औषधांच्या वापराबरोबरच जीवनशैलीचा हृदयाच्या आरोग्यावर विशेष परिणाम होतो. सकस आहार घेऊन आपले वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम करा आणि तणावासारखी परिस्थिती टाळा. जर तुम्हाला उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल किंवा मधुमेह असेल तर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय करत रहा.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar