Saturday, December 6, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अनेक रोगांवर रामबाण वनस्पती ‘अडुळसा’ – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
April 13, 2022
in आरोग्य वार्ता
A A
अनेक रोगांवर रामबाण वनस्पती ‘अडुळसा’ – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – भारतीय संस्कृतीत प्रत्येक आजाराचे निदान नैसर्गिकरित्या बरे करण्याचे तंत्रज्ञान आहे. जसजसे आपण आधुनिक होत आहोत त्याप्रमाणे रोगांची संख्या वाढत आहे. अशा सर्व रोगांवर मात करण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. दरम्यान, इतर सामान्य वनस्पतींप्रमाणे ‘अडुळसा’ (Adulsa) ही देखील बहुगुणी वनस्पती अनेक आजारांना मात देऊ शकते. खोकला, दमा, श्वसन विकार या विकारांत प्रामुख्याने या वनस्पतीचा उपयोग केला जातो.

अडुळसा (Adulsa) सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती असून, तिचे शास्त्रीय नाव ‘अ‍ॅधॅटोडा व्हॅसिका’ असे आहे. अडुळसा (Adulsa) भारत, श्रीलंका आणि मलेशिया इत्यादी देशांत ती आढळते. ही वनस्पती महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने लावतात.

अडुळसा (Adulsa) सुमारे 4 ते 7 फुट उंच वाढते. पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीच्या टोकास फुलोरा येतो. अडुळसाची (Adulsa) मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे आयुर्वेदिक औषधांत वापरली जातात.

अडुळसाचे (Adulsa) बहुगुणी उपयोग –

कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा (Adulsa) या वनस्पतीचा औषध म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. या आयुर्वेदीय वनस्पतीपासून तयार केलेली अनेक औषधे बाजारात उपलब्ध आहेत.

पानांचा रस, मध, सुंठ, मिरी यांचे मिश्रण कफ, खोकला यांवर देतात. तसेच जखम किंवा व्रण यावर अडुळश्याची (Adulsa) पाने बारीक वाटून जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येते.

जर घरात कोणाला श्वासविकार, खोकला, दमा व ताप असेल तर अश्या व्यक्तीला अडुळश्याच्या (Adulsa) पानांचा रस प्यायला द्यावा. तसेच पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप येत असतो. अश्यावेळी ही बहुगुणी वनस्पती हाताशी असावी.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar