Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अजीर्ण, गॅसेस, थायरॉईडवर मात करणारे हलासन कराच – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
March 18, 2022
in आरोग्य वार्ता
A A
अजीर्ण, गॅसेस, थायरॉईडवर मात करणारे हलासन कराच – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

हल म्हणजे नांगर. नांगराच्या आकाराशी साम्य असल्यामुळे या योगासनाला हलासन हे नाव देण्यात आलेले आहे.

हलासन करताना प्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले असावेत. दोन्ही हातांचे पंजे जमिनीला लावून कमरेला जुळवून ठेवावेत. आता श्‍वास हळूहळू बाहेर सोडावा. यानंतर दोन्ही पाय सावकाश वरती उचलावे. गुडघे सरळ ठेवत पाय आकाशाच्या दिशेने उंच उचलावेत. पुन्हा पायांना हळूहळू डोक्‍याच्या मागे नेण्याचा प्रयत्न करावा. अधिक त्रास होत असेल तर पूर्ण कृती न करता हळूहळू सवय करावी आणि दररोजच्या सरावानंतर पाय मागे नेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या कार्यशक्तीनुसारच हा व्यायाम वाढवावा. अन्यथा मानेला त्रास होण्याची शक्‍यता आहे.

सावधगिरीची सूचना :
मानेचा किंवा पाठीच्या मणक्‍याचा विकार असलेल्यांनी हा व्यायाम करणे टाळावे. ज्यांना गळ्याचा गंभीर आजार आहे अशा रुग्णांनीही हे आसन करणे टाळावे.

फायदा :
पाठीच्या मणक्‍याचा त्रास हा वृद्धापकाळात प्रत्येकालाच होतोच. हलासन केल्याने वृद्धापकाळात याचा फायदा होतो. तसेच याच्या नियमित अभ्यासाने अजीर्ण, गॅसेस, थायरॉईड, दमा, कफ, रक्‍तविकार आदी त्रास कमी होतात.
शरीरातील महत्त्वाचा भाग म्हणजे नाड्या. तीन नाड्या आपल्या शरीरात असतात. आपण डॉक्‍टरकडे अथवा कोणत्याही वैद्याकडे गेलो, तर सर्वांत आधी ते आपला हात हातात घेऊन या नाड्या तपासतात. या नाड्यांवरून आपल्याला होणाऱ्या त्रासाचे निदान डॉक्‍टर करत असतात.
या नाड्यांचे काम बिघडले तरी आपण आजारी पडतो. या नाड्यांवर नियंत्रण करण्याचे काम हलासनाने शक्‍य होते. या आसनाने शरीर शुद्ध होतेच शिवाय चेहऱ्यावर तेज निर्माण होते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar