[[{“value”:”
Apple iPhone 16 : जगातील सर्वात मोठी टेक कंपनी Apple ने त्यांचे iPhone 16 आणि iPhone 16 Plus लॉन्च केले आहेत. iPhone 16 आणि iPhone 16 Plus चे प्री-बुकिंग आज दि. 10 सप्टेंबरपासून Apple च्या वेबसाइटवर आणि Apple Store साकेत दिल्ली आणि मुंबईच्या भारतातील स्टोअरमध्ये सुरू होईल.
Apple ने iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये A18 Bionic प्रदान केले आहे, या दोन iPhone चे बुकिंग 10 सप्टेंबरपासून Apple च्या ऑनलाइन वेबसाइटवर आणि ऑनलाइन Apple Store साकेत, दिल्ली आणि मुंबईच्या स्टोअरमध्ये सुरू होईल. Apple ने iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये Apple Intelligence फीचर दिले आहेत.
iPhone 16 आणि 16 Plus मध्ये कॅमेरा कंट्रोल
iPhone 16 आणि 16 Plus मध्ये 16MP आणि 18MP कॅमेरे असतील. यासोबतच या दोन्ही आयफोनमध्ये इंटेलिजेंस कंट्रोल कॅमेरा फीचर असेल, ज्याद्वारे तुम्ही प्रोफेशनल कॅमेऱ्याची माहिती नसतानाही चांगले फोटो क्लिक करू शकाल.
iPhone 16 आणि iPhone 16 Plus ची किंमत
भारतात iPhone 16 ची (128 जीबी) किंमत 79.900 पासून सुरू होईल. त्यानंतर 256 आणि 512 जीबी स्टोरेजची किंमत यापेक्षा पुढे असेल. आयफोन 16 प्लसची किंमत 89.900 रुपये, तर आयफोन 16 प्रोची किंमत1.34.990 रुपये आणि आयफोन 16 प्रो मॅक्स 1.59.000 रुपये असेल. चारही मॉडेलची ही मुळ किंमत असून स्टोरेजच्या पर्यायानुसार किंमत वाढेल.
iPhone 16 आणि iPhone 16 Plus चे तपशील
Apple ने iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये 6.1 आणि 6.7 इंच स्क्रीन दिली आहेत. यासोबतच तुम्हाला iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये फोकस आणि डेप्थ कंट्रोल फीचरसह नेक्स्ट जनरेशन पोर्टाटोनिक देण्यात आले आहे.
तुम्ही iPhone 16 आणि iPhone 16 Plus द्वारे मॅक्रो फोटोग्राफी देखील करू शकता. तसेच, तुम्ही ऑटोफोकससह डेप्थ कॅमेरासह दूरचे फोटो घेऊ शकता.
iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये सॅटेलाइट फीचर
iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये आधीच्या iPhone प्रमाणे सॅटेलाइट फीचर असेल. जेव्हा आयफोन 15 मध्ये सॅटेलाइट फीचर सादर करण्यात आले होते, तेव्हा कंपनीने ते फक्त अमेरिकेत आणले होते, परंतु यावेळी हे सॅटेलाइट फीचर 17 देशांमध्ये सादर करण्यात आले आहे.
हे देखील नक्की वाचा…
Apple iPhone 16 Launch: कोणता फोन घेऊ? ‘iPhone 16 की iPhone 16 Pro’, किंमत आणि फीचर्स एकदा पाहाच…
The post अखेर प्रतीक्षा संपली.! भारतात ‘iPhone 16’ लॉन्च; जाणून घ्या फीचर्ससह सर्वकाही appeared first on Dainik Prabhat.
“}]]