लंडन – गेल्या काही वर्षांपासून अंतराळात मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होऊ लागला असून त्यापासून आगामी अंतराळ मोहिमा संकटात होण्याची भीती निर्माण झाली आहे गेल्या कित्येक वर्षांमध्ये विविध देशांनी ज्या अंतराळ मोहिमा राबवल्या होत्या त्यामुळे हा कचरा निर्माण झाला असून या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याबाबत आता विचारविनिमय सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये आकाशातून काही जळत्या गोष्टी खाली पडल्या होत्या हे जळते तुकडे अंतराळातील कचऱ्याचाच एक भाग असल्याचे आता समोर आले आहे हे तुकडे एका चिनी अवकाशयानाचे यानाचे सुटे भाग असावेत अशी शक्यता व्यक्त होत आहे नासाचे शास्त्रज्ञ डोनाल्ड केस्लर यांनी 1978 मध्ये अशा प्रकारच्या अंतराळ कचऱ्याची भीती व्यक्त केली होती त्यांच्या या सिद्धांताला केस्लर सिद्धांत म्हणून ओळखले जाते पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा अंतराळ कचरा उपलब्ध आहे चुकून तो कचरा जर पृथ्वीच्या वातावरणात आला तर तो गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या दिशेने झेपावतो आणि त्याचे मोठे तुकडे कोठेही नागरी वस्तीमध्ये पडायची ही भीती आहे .
असे अस्मानी संकट एका बाजूला असताना दुसरीकडे या महाकाय कचऱ्यामुळे भविष्यातील अवकाश मोहिमा संकटात होण्याचा धोका निर्माण झाला आहे अवकाश यान प्रक्षेपित करताना हा कचरा अडथळा ठरू शकतो असे आता संशोधकांना वाटत आहे आतापर्यंत जगातील अनेक देशांनी अंतराळामध्ये कृत्रिम उपग्रह सोडले आहेत त्यापैकी अनेक उपग्रहांचा आता कचरा झाला आहे.
आणि भविष्यातही अनेक कृत्रिम उपग्रहांचे रूपांतर कचरामध्ये होणार आहे हे तुकडे सतत पृथ्वीच्या बाहेर फिरत असतात शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सध्या मोठ्या आकाराचे सुमारे पंचवीस हजार तुकडे अंतराळात फिरत आहेत त्यापैकी अनेक तुकडे कधीही पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेत आले तर ते पृथ्वीवर पडू शकतात त्याशिवाय लहान आकाराचे पाच लाखापेक्षा जास्त तुकडे सध्या अंतराळात फिरत आहेत 1 सेंटीमीटर पेक्षा कमी आकाराचे एक कोटीच्या आसपास तुकडे सध्या अंतराळात फिरत असल्याची माहिती अमेरिकन शास्त्रज्ञांनी दिली आहे एकूण नऊ हजार सहाशे टन पेक्षा जास्त वजनाचा अंतरिक्ष कचरा सध्या अंतराळात फिरत आहे हा धोका आता लक्षात आल्यानेच या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याबाबत युद्धपातळीवर चर्चा सुरू करण्यात आली आहे.
error: Content is protected !!