[[{“value”:”
अंडी हे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हींमध्ये मोडतात. त्यामुळे बहुतांश लोकं अंड्याचे सेवन करताना दिसतात. काहीजण हे अंडी उकडून खाणे पसंत करतात. पण आज आम्ही तुम्हाला अंड्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत…. अंडी उकळल्यानंतर आपण ते पाणी बऱ्याचदा फेकून देतो पण असे न करता जर तुम्ही या पाण्याचा योग्य वापर केला तर त्याचे जबरदस्त फायदे तुम्हाला मिळू शकतात. आता ते कोणते फायदे आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात…
पोषकतत्वे
अंड्याच्या टरफलांमध्ये योग्य प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम आणि योग्य प्रमाणात फॉस्फरस, कॅल्शियम आणि सोडियम असते. त्यामुळे आपण जेव्हा अंडी उकळतो तेव्हा त्यातील जीवनसत्त्वे त्या पाण्यात उतरतात. ही जीवनसत्वे असलेलं पाणी जर झाडांना घातले तर त्याचा झाडांच्या वाढीसाठी चांगला फायदा होतो..
खत म्हणून होतो वापर
उकळलेल्या अंड्यांची टरफल आणि अंड्याचे उकळलेले पाणी दोन्ही खतासमान आहेत. एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे कि तुम्ही ज्या पाण्यात अंडे उकळता त्या पाण्यातील पोषकतत्त्वांचा फायदा झाडांना होतो. हे खत अतिशय फायदेशीर ठरते.
टोमॅटोच्या झाडांसाठी अधिक फायदेशीर
ज्या झाडांना योग्य प्रमाणात ऊन मिळत नाही त्यांच्यासाठी हे पाणी अतिशय फायदेशीर असते. एका संशोधनात असे समोर आले आहे की, हे पाणी टोमॅटोच्या झाडांना वापरले तर त्याचा फायदा झाडांना होतो. टोमॉटो अधिक चांगल्या प्रकारे येतात.
अंडे मानवी शरीरासाठी जसे उपयोगी आणि फायदेशीर आहे. अगदी तसेच ते झाडांसाठीदेखील फायदेशीर आहेत. त्यामुळे अंडी उकळलेले पाणी वाया न घालवता त्याचा उपयोग झाडासाठी करा…
The post अंडी उकळल्यानंतर ते पाणी फेकून न देता ‘या’ प्रकारे करा त्याचा वापर appeared first on Dainik Prabhat.
“}]]